पीडीओंना भोवला खासगी कार्यक्रम; बीडी ग्रा.पं प्रकरण!


पीडीओंना भोवला खासगी कार्यक्रम; बीडी ग्रा.पं प्रकरण!

खानापूर:शासकीय कार्यालये आणि ग्रामपंचायतींची सभागृहे ही केवळ लोककल्याणकारी कामांसाठी आणि शासकीय कामकाजासाठी असतात. मात्र, खानापूर तालुक्यातील बीडी ग्रामपंचायतीच्या सभागृहात नियमबाह्यरीत्या एक खासगी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कन्नड इन न्यूज, या वृत्तमाध्यमाने हा उघडकीस आणला आणि बातमी प्रसारित केली होती.
खानापूर तालुका पंचायत प्रशासन आता जागे झाले आणि त्यांनि संबंधित पंचायत विकास अधिकाऱ्याला (PDO) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सदर नोटीशी मध्ये, खासगी कार्यक्रमासाठी शासकीय ग्रामपंचायतीचे सभागृह विनापरवाना व नियमबाह्य उपलब्ध करून देताना संबंधित अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्यात अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.
घटनेच्या दिवशीच दूरध्वनीवरून संपर्क साधून याप्रकरणी जाब विचारत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले होते.
आता कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून तातडीने लिखित स्पष्टीकरण सादर करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
शिस्तभंगाच्या कारवाईचा सज्जड इशारा
या नोटिशीमध्ये तालुका पंचायत प्रशासनाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, जर संबंधित अधिकाऱ्याने वेळेत आपले म्हणणे किंवा स्पष्टीकरण सादर केले नाही, तर त्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीही सांगायचे नाही असे गृहीत धरले जाईल. तसेच, कर्नाटक नागरी सेवा (वर्गीकरण, नियंत्रण व अपील) नियम, १९५७अन्वये त्यांच्यावर कायदेशीर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवण्यात येईल, असा स्पष्ट इशार देण्यात आला आहे.
शासकीय मालमत्तेचा आणि अधिकाराचा अशा प्रकारे खासगी फायद्यासाठी राजरोसपणे गैरवापर होत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता या भ्रष्ट कारभारावर आणि संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासनाकडून नेमकी काय कठोर कारवाई होते, याकडे संपूर्ण खानापूर तालुक्याचे डोळे लागले आहेत.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!