जागृती’ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे रोल मॉडेल -शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत


गुणवत्तेच्या बळावर ‘जागृती’ची यशस्वी भरारी !

 गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री संपत सावंत.

गुणवत्तेच्या बळावर एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत जागृती प्रशालेने यशाची भरारी घेतली असून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला संधी देत त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे रोल मॉडेल असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत यांनी जागृती हायस्कूलच्या एन एम एम एस राज्य व जिल्हा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणगौरव प्रसंगी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश घाळी होते. 

स्वागत व प्रस्ताविक मुख्याध्यापक उमेश सावंत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपमुख्याध्यापक अनिल मसाळे यांनी करून दिला. पुढे बोलताना श्रीमती सुवर्णा सावंत म्हणाल्या,” विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासासोबत व्यक्तिमत्व विकासावर ही अधिक भर देऊन मोबाईलचा अतिवापर टाळावा. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर नवनवीन ज्ञान आत्मसात करून यशाची शिखरे गाठावीत” असे सांगून इथे सक्षम विद्यार्थी घडविणाऱी शाळा, संस्था व शिक्षकांचे कोडकौतुक केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. सतीश घाळी म्हणाले, “हा गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आहे. .विद्यार्थ्यांचे कष्ट, पालकांचे पाठबळ आणि शिक्षकांचे सातत्याने मार्गदर्शन हाच यशाचा मूलमंत्र असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वाससाच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवावे आणि आपल्या ध्येयापर्यंत यशस्वी मजल मारावी” असे सांगितले. कुमारी तनिष्का चिकुर्डे, प्रकाश मांगले यांचेही भाषण झाले. 

सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांचे वाचन सौ. श्वेता पुंडपळ, सौ. सविता कमनूरी, प्रवीण सावंत यांनी केले. एन एम एम एस शिष्यवृत्तीधारक ऋतुराज येसरे, समर्थ पाटील, श्रावणी बाळीकाई, पूर्वी रणदिवे, साक्षी देसाई, राघवेंद्र सुतार, अमेय देसाई, कल्पित पाटील, सिद्धी देसाई, श्रुतिका पाटील, सई भादवणकर, स्वरा दिवेकर, सागरीका सूर्यवंशी,अनघा श्रेष्ठी यासह जवळजवळ ६१ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सहसचिव गजेंद्र बंदी, माजी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, शिवाजी अनावरे,सौ. सुनीता पाटील,प्रा. विद्या पन्हाळे, प्रा .स्वाती क्षीरसागर, प्रा.गुरुलिंग खंदारे, डायस मॅडम, महावीर कासार यासह सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे, सौ. कल्पना पाटील यांनी केले. आभार पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांनी मानले.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!