खानापुरात रातोरात बसविला महर्षी वाल्मिकी पुतळा


खानापुरात रातोरात बसविला महर्षी वाल्मिकी पुतळा

समाज भवन उभारणीच्या मागणीसाठी वाल्मीकी समाजाचे खानापुरात ठिय्या आंदोलन

राजू कुंभार: खानापूर 

खानापूर शहरात सोमवारी रात्री स्थानिक वाल्मीकी समाजाचे प्रमुख आणि नागरिकांनी मिळून महर्षी वाल्मीकी यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली आहे. शहरातील जगज्योती बसवेश्वर चौकाजवळ, साहाय्यक कृषी संचालकांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या रिकाम्या जागेवर रात्रीतून सहा फूट उंच वाल्मीकी पुतळा बसविण्यात आला.

सोमवारी उशिरा रात्री पुतळा बसविण्यात आल्यानंतर, मंगळवार सकाळपासूनच या ठिकाणी वाल्मीकी समाजाच्या नागरिकांनी बसून धरणे आंदोलन सुरू केले आहे. खानापूर शहरात वाल्मीकी भवन (समाज मंदिर) निर्माण करावे, अशी मागणी समाजाकडून बऱ्याच दिवसांपासून सरकारकडे सतत निवेदनांद्वारे केली जात होती. मात्र, या मागणीला सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे, समाजातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली आहे. जोपर्यंत समुदाय भवन बांधले जात नाही, तोपर्यंत या पुतळ्यासमोरच धरणे आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

या प्रसंगी मल्लेशी पोळ, हनुमंत गुड्लार, मल्लेशी नायक, पांडुरंग गुळणवर, बसवणी कोटूर, राजु नाईक, महेश शिगीहळ्ळी व इतर समाजबांधव उपस्थित होते.

Advertise ..


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!