चंदगडमध्ये सुनील वाडकर यांचे निधन; चंदगड शहर व नाभिक समाजात हळहळ व्यक्त.


विश्वास हेअर कटिंग सलूनच्या माध्यमातून शहरवासीयांशी जिव्हाळ्याचे संबंध; अचानक निधनाने सर्वत्र शोक.

चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

चंदगड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वास हेअर कटिंग सलूनचे मालक सुनील वाडकर यांचे शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर ) रात्री १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. अचानक उद्भवलेल्या प्रकृतीच्या त्रासानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने चंदगड शहरासह नाभिक समाजात हळहळ व्यक्त होत आहे.

काही वर्षांपूर्वी सुनील वाडकर यांना कावीळची लागण झाली होती. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळी अचानक त्यांना प्रकृतीचा त्रास जाणवू लागला. त्यांना उपचारासाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

समाजकार्यात अग्रेसर व मनमिळावू स्वभाव :

सुनील वाडकर हे चंदगड तालुका नाभिक पतसंस्था, माणगावचे संचालक होते. नाभिक समाजाच्या सामाजिक व संघटनात्मक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. समाजातील विविध उपक्रम आणि कार्यांमध्ये ते अग्रेसर असत. चंदगड शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांचे विश्वास हेअर कटिंग सलून असल्याने त्यांचा शहरातील नागरिकांशी दांडगा जनसंपर्क होता. मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वपरिचित होते.

त्यांच्या पश्चात आजी, आई, पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने वाडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरातील नागरिक व नाभिक समाजातील बांधवांकडून शोक व्यक्त केला जात आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!