डेरवणमध्ये यशाची मोहर; न. भु. पाटील कॉलेज चे दोन खेळाडू राज्यस्तरावर!


१९ व १७ वर्षांखालील गटात पटकावले द्वितीय क्रमांक; महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

 रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे आयोजित मैदानी क्रीडा स्पर्धेत चंदगड येथील न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाच्या जोरावर दोन्ही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाविद्यालयातील जैनब अस्लम मुल्ला  आणि यश विजय वाके.  या विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडाकौशल्याची छाप पाडली. १९ वर्षांखालील मुलींच्या भालाफेक प्रकारात बारावी विज्ञान शाखेतील जैनब मुल्ला हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तर १७ वर्षांखालील मुलांच्या थाळीफेक प्रकारात अकरावी विज्ञान शाखेतील यश वाके याने द्वितीय क्रमांकाची कमाई केली.

दोन्ही खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांना महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा. एन. डी. हदगल आणि टी. व्ही. खंडाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने कौतुक होत असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!