वनविभागाची मोठी कारवाई: जिवंत कासव आणि साळींदराचे मांस जप्त


खालसा म्हाळुंगे-मलगड येथे छापेमारी; दोघांना अटक, दोघे फरार

​चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.

    पाटणे वनपरिक्षेत्राच्या पथकाने खालसा म्हाळुंगे-मलगड येथे एका घरावर धाड टाकून साळींदराची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पथकाने जिवंत कासव, साळींदराचे मांस, शिकारीचे साहित्य आणि मोबाईल असा एकूण ₹१ लाख ९८ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांची धडक कारवाई 

​एका घरात साळींदराचे मांस शिजवले जात असतानाच वनविभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी पुंडलिक निंगाप्पा गुरव (वय ४६), देवाप्पा बाबू कुलम (वय ३४), रामलिंग धोंडीबा गवस (वय ३९) आणि तुकाराम शंकर गावडे (वय ४०) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन आरोपी फरार 

​यातील दोघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली असून अन्य दोघे संशयित फरार झाले आहेत. वनक्षेत्रपाल शितल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!