न्यु होरायझन येथे ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ व ‘जागतिक हत्ती दिन’ उत्साहात साजरा!


“पुस्तक म्हणजे ज्ञानाचा दीप, जीवनाचा खरा सोबती”– मुख्याध्यापिका सौ. सुनीता पाटील.

औरनाळ प्रतिनिधी : श्री. स्वप्निल कुंभार.

विद्या प्रसारक मंडळाच्या न्यू हॉरिझॉन स्कूल, औरनाळ येथे ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ आणि ‘जागतिक हत्ती दिन’ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ज्ञानवर्धक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची गरज या दोन्ही विषयांवर मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

कार्यक्रम प्रसंगी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता पाटील मॅडम यांच्या हस्ते आदरपूर्वक करण्यात आले.

ग्रंथपाल व कला शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन:

वाचन संस्कृती व ग्रंथालयाचे महत्त्व: शाळेचे ग्रंथपाल श्री. अमोल चोथे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथपालाची भूमिका, शालेय ग्रंथालयाची उपयुक्तता आणि अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी पुस्तकांचे असलेले महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

पर्यावरण व हत्ती संवर्धन:
या प्रसंगी ग्रंथपाल श्री. अमोल चोथे यांनी ‘जागतिक हत्ती दिना’चे औचित्य साधून विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण आणि हत्तींच्या संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच भारत सरकारने तयार केलेली ‘प्रोजेक्ट एलिफंट’ ही विशेष डॉक्युमेंटरी (माहितीपट) विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली, ज्याद्वारे विद्यार्थ्यांनी वन्यजीव संरक्षणाचे बारकावे समजून घेतले.

‘भारतीय वारसा प्राणी – हत्ती’ चित्रकला स्पर्धा: विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी व हत्तींविषयी आपुलकी निर्माण करण्यासाठी कला शिक्षक श्री. स्वप्निल कुंभार यांनी ‘भारतीय वारसा प्राणी: हत्ती’ या विषयावर आकर्षक चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या सुंदर कलाकृती साकारल्या.

या दोन्ही उपक्रमांमुळे शाळेत अभ्यासासोबतच वाचन आणि निसर्गप्रेमाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडले.

 


106
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!