न्यू होरायझन स्कूल औरणाळचे व्हॉलीबॉल स्पर्धेत वर्चस्व ; पटकावला ‘तिहेरी मुकुट’!


१४ व १७ वर्षांखालील गटात औरणाळच्या खेळाडूंचा डंका; विजेत्या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!

गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

  गडहिंग्लज तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत न्यू होरायझन स्कूल, औरणाळच्या खेळाडूंनी अद्भूत कामगिरी करत स्पर्धेत आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले आहे. १७ वर्षांखालील मुले व मुली, तसेच १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून शाळेला ‘तिहेरी मुकुट’ मिळवून दिला. विजेत्या सर्व संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 सदर तालुकास्तरीज व्हॉलीबॉल स्पर्धेला २४ संघ मुली तसेच २८ मुलांच्या संघाने सहभाग दर्शवला.सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मैदान गाजवले.

​स्पर्धेचा गटनिहाय अंतिम निकाल पुढीलप्रमाणे:

​१४ वर्षांखालील मुली:

​प्रथम: न्यू होरायझन स्कूल, औरणाळ

​द्वितीय: हलकर्णी हायस्कूल, हलकर्णी

​१४ वर्षांखालील मुले:

​प्रथम: हलकर्णी हायस्कूल, हलकर्णी

​द्वितीय: एस. एम. हायस्कूल, बसर्गे

​१७ वर्षांखालील मुली:

​प्रथम: न्यू होरायझन स्कूल, औरणाळ

​द्वितीय: एस. एम. हायस्कूल, बसर्गे

​१७ वर्षांखालील मुले :

​प्रथम: न्यू होरायझन स्कूल, औरणाळ

​द्वितीय: वि. दि. शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज

​१९ वर्षांखालील मुली:

​प्रथम: जागृती हायस्कूल व रावसाहेब अण्णा कितुरकर ज्युनिअर कॉलेज

​द्वितीय: हलकर्णी हायस्कूल, हलकर्णी

​१९ वर्षांखालील मुले:

​प्रथम: रावसाहेब अण्णा कितुरकर कॉलेज व जागृती ज्युनिअर कॉलेज

​द्वितीय: एस. एम. हायस्कूल, बसर्गे

​उत्कृष्ट नियोजन व सहकार्य:

​सदर स्पर्धा तालुका क्रीडा समन्वयक श्री. विनायक नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात आणि क्रीडामय वातावरणात पार पडल्या.

​स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक सुरेश पाटील (हलकर्णी) आणि सुनील रेडेकर (बसर्गे) यांनी विशेष सहकार्य केले. तसेच पंच म्हणून अनिल चौगुले, गावित सर व वाडकर सर यांनी उत्तम काम पाहिले.

​तालुकास्तरावर घवघवीत यश संपादन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व विजेत्या खेळाडूंचे व संघकांचे सर्वत्र कौतुक होत आहे


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!