नागुर्डातील कलाकारांनी गाजवला स्टेज!


नागुर्डातील कलाकारांनी गाजवला स्टेज!

बालकलाकारांपासून तरुणाईपर्यंत कलाविष्कार; ग्रामस्थांकडून बक्षिसांचा वर्षाव

राजू कुंभार : खानापूर

नागुर्डा : नागुर्डा (ता. खानापूर) येथील दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डान्स आणि नाट्य स्पर्धेत स्थानिक कलाकारांनी आपल्या अफाट कलागुणांचे प्रदर्शन करत अवघा स्टेज गाजवला. लोकगीते, भारुड आणि चित्रपट गीतांवरील बहारदार नृत्य तसेच विनोदी नाटिकांनी उपस्थितांना भुरळ घातली. या भरगच्च सांस्कृतिक मेळाव्याला नागुर्डा गावासह परिसरातील खेड्यांमधून आलेल्या नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत कलाकारांवर बक्षिसांचा मोठा वर्षाव केला.

कार्यक्रमात संदीप लक्ष्मण कांबळे या कलाकाराने साकारलेल्या स्त्री-पात्राने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. त्याच्यासोबत कृष्णा मारुती कोळी, मनोज संजू बिरजे, ज्ञानेश्वर रामू खाबळे आणि योगेश मारुती पाटील या कलाकारांनी आपल्या खुमासदार अभिनयाने उपस्थितांना खळखळून हसविले.

तसेच, सोनाली ज्ञानेश्वर पाटील हिने सादर केलेल्या वैयक्तिक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. तिच्यापाठोपाठ अक्षरा मारुती कोळी, देमवा शंकर खाबळे, ऐश्वर्या मारुती कोळी, गौरी गोपाळ पाईक, रोशना गोपाळ पाईक, अनुराधा शंकर खाबळे, ऋतुजा दत्तू सलाम, अमोल्या महेश पाऊसकर, राधिका प्रमोद चापगावकर आणि परी प्रमोद चापगावकर यांच्यासह इतर लहान-मोठ्या मुलींनी विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमाच्या शेवटी दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना प्रोत्साहनपर मानचिन्ह (स्मृतीचिन्ह) देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मंडळाच्या या यशस्वी आयोजनाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.

व्हिडिओ

व्हिडिओ


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!