तहसीलदार आणि सहकाऱ्या विरोधात कारवाईची मागणी!


कार्यालयीन वेळेत दारू पिणाऱ्या तहसीलदार आणि सहकाऱ्या विरोधात कारवाईची मागणी!

खानापूर:राजू कुंभार
शासकीय कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत खानापूरचे तहसीलदार दुंडप्पा कोमार व इतर अधिकाऱ्यांनी तालुक्यातील जांबोटजवळील बेळगाव- चोर्ला राज्य महामार्गावरील ‘संगीता ढाबा’ हॉटेलमध्ये बसून मद्य प्राशन केले आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात सरकारने कारवाई करावी, तसंच सरकारी नोकर संघटनेच्या पत्रकार परिषदेत आपले खासगी फोटो प्रिंट काढू इतरांना दाखविले, फेक पत्रकार असा उल्लेख केला त्या संदर्भात न्यायालयात जाणार असल्याची माहिती विलास कवठणकर आणि सागर कोलेकर यांनी दिली.
रविवारी शहरातील शासकीय (सार्वजनिक) बांधकाम विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, “काही दिवसांपूर्वी कामानिमित्त मी माझे मित्र प्रजा नेरळू या कन्नड दैनिकाचे संपादक सागर कोळेकर यांच्यासह कणकुंबीला गेलो होतो, तेथून परत जांबोटीला येत असताना दुपारच्या जेवणासाठी संगीता ढाब्यावर गेलो असता, तिथे तहसीलदार दुंडप्पा यांच्यासह ग्रेड-२ तहसीलदार एस.के. तंगोळी, महसूल निरीक्षक रमेश कोलकार मद्य प्राशन करण्यात मग्न होते. जबाबदारीच्या पदावर असलेले तालुका दंडाधिकारी शासकीय कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत आपली शासकीय गाडी ढाब्यासमोर उभी करून आपल्या अधिकाऱ्यांसह व कर्मचाऱ्यांसह मद्य प्राशन करत असल्याबाबतची योग्य कागदपत्रे मी गोळा केली असून, या घटनेची माहिती त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुराव्यासह देण्यात आली आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 च्या दरम्यान प्रजा नेरळू या कन्नड दैनिकाचे संपादक सागर कोळेकर यांनी जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक आयुक्तांना दूरध्वनीवरून संपर्क साधून आज तहसीलदार, ग्रेड टू तहसीलदार, सर्कल या तिघांनीही दारू प्राशन केली असून, त्यांची आजच्या आज टेस्ट करण्याची मागणी केली, त्यावर प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांनी उत्तर देताना, फोनच्या टेक्स मॅसेजवरून दखल घेऊ अशी हमी दिल्याचा संदेश सागर कोळेकर यांना पाठवला. हाही पुरावा सागर कोळेकर यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दाखवला.

तहसीदार, आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे अनेक पुरावे

रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी प्रजा नेरळू दैनिकाचे संपादक सागर कोळेकर व त्यांचे खानापूर प्रतिनिधी विलास कवठणकर यांनी बोलतांना, तहसीलदार आणि त्यांचे अधिकारी दारू एका पार्टी करतानाचा व्हिडिओ दाखविला. तसेच कामावर असताना झोपा काढत असल्याचा फोटोही दाखविला.

फेक पत्रकार दाव्यावर प्रत्युत्तर; केस करणार : विलास कवठणकर

विलास कवठणकर दैनिक प्रजा नेरळू या कन्नड दैनिकाचा खानापूर प्रतिनिधी असतानाही, शुक्रवारच्या सरकारी नोकर संघटनेच्या पत्रकार परिषदेत बसवराज येल्लुर यांच्याकडून फेक पत्रकार असा उल्लेख करण्यात आला आहे, तशी प्रसिध्दी दैनिकांमध्येही झाली आहे, त्याविरोधात वेगळी तसे चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांविरोधात तक्रार करणार असल्याचे प्रजा नेरळू प्रतिनिधी विलास कवठणकर यांनी यावेळी सांगितले, त्याला प्रजा नेरळू दैनिकाचे संपादक सागर कोळेकर यांनी दुजोरा दिला. पुढे बोलतांना, विलास कवठणकर यांनी मी गेल्या पंधरा वर्षे अनेक दैनिकात वार्ताहर म्हणून काम करत असून, त्याचा संपूर्ण तालुक्यात परिचय आहे, तरीही सरकारी नोकर संघटनेच्या पत्रकार परिषदेत फेक पत्रकार म्हणणे चुकीचे असून, त्याचाही कायदेशीर समाचार घेण्यात येईल असेही ते म्हणाले.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!