
महिंद्रा मध्ये तरुणांसाठी प्रशिक्षणार्थी पदाची मोठी संधी
चाकण येथे ट्रेनी पदासाठी भरती; १८ ते २८ वयोगटातील उमेदवारांना संधी
वर्षा कुंभार: वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, चाकण येथे नवोदित तरुणांसाठी कौशल्य विकास आणि अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीकडून ट्रेनी (प्रशिक्षणार्थी) पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, १८ ते २८ वर्षे वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
या भरतीमध्येSSLC ,HSC, BA, B.Com आणि B.Sc. पदवीधर, तसेच मेकॅनिकल, E&TC, इलेक्ट्रिकल आणि ऑटोमोबाईल डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय ITI मधील डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, फिटर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मशिनिस्ट, टर्नर आणि वेल्डर या ट्रेडमधील उमेदवारही अर्ज करू शकतात.
विशेष म्हणजे, या पदांसाठी पूर्वानुभवाची आवश्यकता नसल्याने नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांसाठी ही महत्त्वाची संधी आहे.
मात्र, फोर व्हीलर आणि हेवी व्हेईकल ड्रायव्हर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
थेट मुलाखतीची प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. उमेदवारांनी संपूर्ण अर्जासह चार पासपोर्ट आकाराचे फोटो, मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्रे तसेच त्यांच्या छायाप्रती सोबत आणणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिसशि)साठी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून, मुलाखतीपूर्वी NAPS पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
खालील स्कॅनर ला गुगल वर स्कॅन करून त्यावर आपली माहिती भरावी

मुलाखतीचे ठिकाण
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, गेट नंबर ०२,प्लॉट नंबर अ-१, MIDC फेज-४,चाकण, ता. खेड, जि. पुणे.
अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी 7387703444, 7058007554, 9175419023 या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच chakanrecruitment@mahindra.com या ई-मेलवरही संपर्क करता येईल.
शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी वाहन निर्मिती क्षेत्रातील कौशल्य आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळवून करिअरची सुरुवात करण्याची ही संधी ठरू शकते.
Advertise….


