डॉ. एस. एस. घाळी साहेब यांचे कार्य गडहिंग्लजकरांच्या सदैव स्मृतीत अजरामर राहील -सौ. सुनीता डी. पाटील.(मुख्याध्यापिका)
उपसंपादक: श्री. स्वप्निल कुंभार. (चंदगड,गडहिंग्लज, आजरा)
औरनाळ : विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कै डॉ एस एस घाळी साहेब यांच्या 39 व्या स्मृतिदिनानिमित्त विद्याप्रसारक मंडळ संचलित न्यू होरायझन स्कूल औरनाळ येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेमध्ये कै डॉ घाळी साहेबांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी सुनीता पाटील शाळेच्या मुख्याध्यापकांनी घाळी साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली
याप्रसंगी मुख्याध्यापिका सुनीता पाटील यांनी कै डॉ घाळी साहेबांच्या शैक्षणिक,सामाजिक, सहकार आणि वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली समाजाच्या सर्वांनी विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले
कला विभाग मार्फत पोर्ट्रेट स्पर्धा.
विद्यार्थ्यांनी कै डॉ घाळी साहेबांची विविध पोस्टर्स व स्केचेस तयार करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले तसेच विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे घाळी साहेबांच्या जीवन कार्याचा आढावा घेत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

पोर्ट्रेट स्पर्धेमध्ये कु. जान्हवी माने (प्रथम), स्वरूप संजय चौगुले (द्वितीय), दिया चौगुले (तृतीय) हॆ विजेते घोषित करण्यात आले.
या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे वातावरण आदर कृतज्ञता आणि प्रेरणादायी विचारांनी धारण केले होते.




