खर्चाचा गाजावाजा टाळून रुग्णसेवेचा आदर्श
भाजप युवा अध्यक्ष किशोर हेब्बाळकर यांचा उद्या वाढदिवस
अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजोपयोगी उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श पायंडा पाडत खानापूर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कु. किशोर पांडुरंग हेब्बाळकर उद्या (दि. २६ नोव्हेंबर) खानापूर शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करणार आहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, तालुक्याच्या राजकारणातील या उगवत्या आणि तडफदार नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
व्यवसाय ते राजकारण : एक यशस्वी प्रवास
निर्भीड, निगर्वी आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असलेले युवा नेतृत्व म्हणून कु. किशोर हेब्बाळकर यांनी अल्पावधीतच खानापूर तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत त्यांनी सामाजिक कार्याचा वसा घेतला आणि त्यातूनच राजकीय क्षेत्रात आपली चमक दाखवली. अभ्यासू वृत्ती, उत्कृष्ट वक्तृत्व शैली, नम्र स्वभाव आणि एका जबाबदार लोकनेत्याला शोभेल अशी कार्यपद्धती यामुळे ते आज तालुक्यातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
वरिष्ठांचा विश्वास आणि संघटनात्मक कौशल्य
किशोर हेब्बाळकर यांच्या निस्वार्थ समाजकार्याची दखल घेत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. आमदारांच्या या विश्वासाला पूर्णपणे पात्र ठरत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात हिरिरीने सहभाग घेतला आणि पक्षसंघटनेची धुरा समर्थपणे पेलली. त्यांच्या या कामाचा धडाका आणि संघटन कौशल्य पाहूनच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर ‘युवा मोर्चा तालुकाध्यक्ष’ पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
तालुक्याला हवे असलेले आश्वासक नेतृत्व
सध्याच्या काळात खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी किशोर हेब्बाळकर यांच्यासारख्या धडाडीच्या, सुशिक्षित आणि तरुण नेतृत्वाची नितांत गरज भासत आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या या उगवत्या नेतृत्वाला भविष्यात आणखी मोठ्या संधी मिळोत आणि त्यांच्या हातून तालुक्याची अशीच उत्तरोत्तर सेवा घडो, अशा सदिच्छा कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
Advertise

Advertise


