कान्सुली गावाला स्वतंत्र विद्युत् पुरवठा द्या
आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याकडे कान्सुली ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी; विकासकामांवरही झाली चर्चा
खानापूर: राजू कुंभार
मुघवडे गावापर्यंत १४ गावांना जोडणाऱ्या प्रमुख थ्री-फेज विद्युत लाईनमध्ये वारंवार बिघाड व दुरुस्तीची कामे निघत असल्याने, खानापूर-जांबोटी रस्त्यालगत असलेले कान्सुली गाव सतत अंधारात चाचपडत आहे. ही गंभीर समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी कान्सुली गावाला रस्त्याकडेने जाणाऱ्या मुख्य थ्री-फेज लाईनवरून स्वतंत्र विद्युत पुरवठा देण्यात यावा, अशी आग्रही मागणी कान्सुली येथील ग्रामस्थांनी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याकडे केली आहे.
मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा
दुसऱ्या एका बैठकीत ग्रामस्थांनी आमदार हलगेकर यांच्याशी थेट संवाद साधत गावातील विविध समस्या मांडल्या. यामध्ये रस्ते दुरुस्ती, पिण्याचे पाणी, सुरळीत वीज पुरवठा, शेती-सिंचन सुविधा आणि शेत रस्ते यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा समावेश होता. तसेच शासकीय योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची मागणी करण्यात आली. आमदारांनी सर्व मागण्या शांतपणे ऐकून घेत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ योग्य त्या सूचना देण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी भाजप नेते मल्लाप्पा मारीहाळ, भरमाणी पाटील यांच्यासह ग्रामस्थ मनोहर कालमनकर, रामू गावडे, अन्नप्पा चाळगुंडे, सुभाष ओलमनकर, बाबुराव शिपूरकर, मोहन नागोंडे, बडकू किनेकर, शंकर किनेकर, कल्लाप्पा नागोंडे, सदानंद किनेकर, कृष्णा गवसेकर, ज्योतिबा चौकुलकर, मोहन नवलुचे, हुवापा नवलूचे, संतोष शिपुरकर, पिंटू नवलुचे, सागर चौकुलकर, तुकाराम नवलुचे, रंगाप्पा धामणेकर, वसंत नागोंडे आणि दोन्ही गावांतील प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



