
मल्लापा मारिहाळ यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
खानापूर;
माजी तालुका पंचायत सभापती व तालुका भाजप चे प्रधान सरचिटणीस मल्लपा मारीहाळ यांनी तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी आजी माजी लोक प्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदीजींच्या उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी चौराशी माता मंदिरामध्ये विशेष पूजा व अर्चना करण्यात येणार आहे. अशी त्यांनी दिली आहे.
पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी खालील नियोजनानुसार मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन श्री बसवराज सानिकोप (तालुका भाजप अध्यक्ष) व श्री गुंडू तोपिनकट्टी (तालुका भाजप प्रधान सरचिटणीस) यांनी केले आहे.आहे.
कार्यक्रम पत्रिका:
* सकाळी ११:०० वाजता: सर्व कार्यकर्त्यांनी श्री चौराशी माता मंदिर येथे एकत्र जमणे व पूजा-अर्चना.
* सकाळी ११:३० वाजता: भाजप कार्यालयामध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संदर्भात विशेष बैठक व चर्चा.
* दुपारी १२:३० वाजता: शासकीय रुग्णालयात (सरकारी दवाखाना) रुग्णांना फळ वाटप.
Advt…………



