शेतजमिनीच्या वादातून प्रकार; तिघांविरुद्ध चंदगड पोलिसांत गुन्हा.
उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार. (चंदगड, आजरा, गडहिंग्लज)
चंदगड : शेतजमिनीच्या वादातून तीन एक रातील रताळ्याच्या पिकावर तणनाशक फावरल्याचा प्रकार घडला आहे. शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान करून त्याला धमकी दिल्याप्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तुडिये-हजगोळी रोड तुडये (ता. चंदगड) येथे ११ ते १२ ऑगस्ट दरम्यान घडल्याचे कल्लाप्पा तुकाराम जाधव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

प्रकरणी, उमाजी कल्लाप्पा हुलजी,कार्तिक उमाजी हुलजी कलप्पा उमाजी हुलजी, सर्व रा. तुडिये, ता. चंदगड यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कळप्पा तुकाराम जाधव यांच्या शेतजमिनीच्या गट क्रमांक ८३१ बाबत न्यायालयात वाद सुरू आहे. या जमिनीवरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या शेतात सुरू असलेल्या रताळी पिकाचे तीन एकर क्षेत्रातील तननाशक फवारून नुकसान केल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. तसेच, ‘तुम्हाला काय करायचे ते करा, आमच्याविरुद्ध तक्रार केली तरी तुम्हाला जिवंत सोडणार नाही,’ अशा स्वरूपाची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३२४(५), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल पाटील हे प्रकरणाचा तपास करीत आहेत.




