गृहलक्ष्मी’च्या नियमांनी महिलांची उडाली झोप!


‘गृहलक्ष्मी’च्या नियमांनी महिलांची उडाली झोप!

वर्षा कुंभार: नागुर्डा

कर्नाटक सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘गृहलक्ष्मी योजने’ बाबत एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची छाननी करण्यासाठी प्रशासनाकडून अचानक घरोघरी जाऊन कागदपत्रांची पडताळणी (Document Verification) सुरू करण्यात आली असून, यामुळे लाभार्थी महिलांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अंगणवाडी सेविका आणि शासकीय कर्मचारी थेट महिलांच्या घरी पोहोचून तब्बल १२ प्रकारच्या कागदपत्रांची कडक तपासणी करत आहेत.

पडताळणीचा मुख्य उद्देश काय?

* पात्रतेची खात्री: योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि गरजू महिलांपर्यंतच पोहोचत आहे की नाही, हे तपासणे.

* माहितीतील त्रुटी दुरुस्त करणे: बँक खात्याचा तपशील, नावात असणारा फरक आणि आधार कार्डावरील माहितीतील तफावत दूर करणे.

महिलांची धावपळ का वाढली?

अचानक सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे महिलांना आधीच जमा केलेली कागदपत्रे पुन्हा शोधून ठेवावी लागत आहेत. अनेक महिलांच्या बँक खात्यातील नाव आणि आधार कार्डावरील नाव यांमध्ये तफावत आढळत आहे.

सर्वात मोठी अडचण म्हणजे—बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर हा अनिवार्यपणे महिलेच्या स्वतःच्याच नावावर असावा, अशी नवी अट घालण्यात आली आहे. बहुतांश महिलांच्या बाबतीत मोबाईल सिम कार्ड पती किंवा इतर नातेवाईकांच्या नावावर असल्याने, या अटीमुळे महिलांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. ही ‘जाचक अट’ रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

तपासणीसाठी ही १२ कागदपत्रे ठेवा तयार:

१. लाभार्थी महिलेचे अद्ययावत आधार कार्ड

२. रेशन कार्ड

३. मतदार ओळखपत्र (Voter ID)

४. गृहलक्ष्मी योजनेचे मंजुरी पत्र

५. बँक पासबुक / पोस्टाचे बचत खाते (बँक शाखा कर्नाटकात असणे आवश्यक)

महिलेच्या स्वतःच्या नावावरील आधार-लिंक मोबाईल नंबर

पतीचे आधार कार्ड

उद्योग किंवा व्यवसायाची माहिती

जात दाखला (SC/ST प्रवर्गातील महिलांसाठी)

. लाभार्थी महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो

प्रशासनाचे आवाहन:घरोघरी सुरू असलेल्या या पडताळणी मोहिमेत महिलांनी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांच्या नोंदी सिस्टीममध्ये अद्ययावत केल्या जातील.

Advertise..


112
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!