
बाळेकुंद्री पालखी भजन सेवेतील मुक्ताबाई साळवी यांचे निधन
गडहिंग्लज: स्वप्नील कुंभार
गिजवने गावातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती. मुक्ताबाई मारुती साळवी यांचे दुःखद निधन झाले आहे. अंत्यविधी आज 3/09/2026 सकाळी ठीक १० वाजता होणार आहे.
मुक्ताबाई या केवळ एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व नव्हत्या, तर आपल्या मधुर, जादुई आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या आवाजाने अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या एक श्रद्धेय महिला होत्या. *“दत्त दर्शनाला जायचं”, “प्रेमाचा सागर, प्रेमाचा सागर”, “दत्तप्रभू देई भेटी विनवितो तुजला”* यांसारखी अनेक भक्तिपदे त्यांच्या विशेष आवडीची होती. त्यांच्या सुरेल आवाजातून ही पदे ऐकताना प्रत्येक भक्ताचे मन भक्तिरसात तल्लीन होत असे.
गडहिंग्लज आणि बाळेकुंद्रे येथील पालखी सेवेमध्ये, आपल्या मधुर व जादुई आवाजाने त्यांनी सर्व वातावरण भक्तिमय करून टाकले. त्यांच्या भजनातून, सेवेतून आणि भक्तिभावातून माऊलीच्या चरणी त्यांनी अर्पण केलेली सेवा सदैव स्मरणात राहील.
आज त्यांच्या जाण्याने भजन सेवेतील एक अनमोल स्वर कायमचा हरपला आहे. त्यांनी निर्माण केलेली पोकळी कधीही भरून निघणार नाही आणि त्यांच्या आठवणी आयुष्यभर सर्वांच्या मनात जिवंत राहतील.




