म.फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा दूत’ ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा


म.फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा दूत’ ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

खानापूर: वर्षा कुंभार

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीचे औचित्य साधून १६ ते २१ वयोगटातील जगभरातील मराठी भाषक तरुणांसाठी ‘मराठी भाषा दूत’ ही राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेची प्रमुख वैशिष्‍ट्ये व नियम:

* वयोगट: जगभरातील १६ ते २१ वर्षे वयोगटातील मराठी भाषक तरुण.

* वेळ मर्यादा: प्रत्येक स्पर्धकाला भाषणासाठी जास्तीत जास्त ३ मिनिटांचा कालावधी दिला जाईल.

* स्पर्धेचा कालावधी: २९ सप्टेंबर २०२६ ते ५ ऑक्टोबर २०२६ (सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत, ऑनलाईन माध्यमातून).

* प्रवेश मर्यादा: प्रथम नोंदणी करणाऱ्या फक्त १००० स्पर्धकांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. एका महाविद्यालयातून कितीही विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

* आयोजन: या स्पर्धेचे संयोजन ‘ऑगस्ट मीडिया’ या संस्थेकडे सोपवण्यात आले आहे.

स्पर्धेचे विषय:

१. महात्मा फुले यांचे मराठी साहित्यातील योगदान

२. महात्मा फुले आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार

३. महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षण व स्त्री सक्षमीकरण यांतील योगदान

४. महात्मा फुले – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्फूर्तिस्थान

५. महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचार

६. आजच्या काळात महात्मा फुले यांच्या विचारांचे महत्त्व

पुरस्कार व गौरव:

स्पर्धेतून सर्वोत्तम १०० वक्त्यांची निवड ‘मराठी भाषा दूत’ म्हणून केली जाईल. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे ‘मराठी भाषा दूत’ हे विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल, जे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी अत्यंत प्रभावी ठरेल. तसेच, सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

नोंदणी व संपर्क:

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २५ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत गुगल फॉर्म भरणे अनिवार्य आहे.

* नोंदणी लिंक: https://forms.gle/3MSNkcFk8GV4iy6C9

* ईमेल संपर्क: augustmedia2026@gmail.com

या मोहिमेत १६ ते २१ वयोगटातील जास्तीत जास्त युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन मराठी भाषा विभागातर्फे करण्यात आले आहे.


107
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!