
शाहू राजे नगर दुर्गादेवी मंडळाकडून दृष्टीहीन गायकाचा सन्मान!
निवृत्त डीसीएफ एस. एस. निंगाणींची सत्कार; बालगायक रोहन लाखेच्या पाठीशी उभे निंगाणींची ग्वाही
खानापूर: राजू कुंभार
शाहू राजे नगर, खानापूर येथील दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात निवृत्त डीसीएफ एस. एस. निगाणी साहेब यांचा सत्कार करण्यात आला, तसेच जन्मताच दृष्टीहीन असलेल्या रोहन लाखे याच्या अफाट गायनकलेचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमोद कोचरी आणि नगरसेवक लक्ष्मण मादार, विशाल सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थितांची नवरात्रोत्सवानिमित्त समयोचित भाषणे झाली.
बालगायक रोहनचा हार घालून विशेष सत्कार
कार्यक्रमादरम्यान दृष्टीहीन बालगायक रोहन लाखे याने आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली. जन्मताच दृष्टीहीन असूनही निसर्गाने दिलेल्या गायनाच्या अद्भुत कलेची दखल घेत निवृत्त डीसीएफ एस. एस. निगाणी यांनी स्वतः रोहनला हार घालून सन्मानित केले. “तुझ्यात मोठी प्रतिभा असून भविष्यात तुला मोठ्या गायन स्पर्धेत उतरवण्यासाठी मी पूर्ण सहकार्य करेन,” असा विश्वास देऊन त्यांनी रोहनचा उत्साह वाढवला.
मान्यवरांची उपस्थिती
या सत्कार सोहळ्यास परिसरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. श्री. दिलीप सोनटक्केश्री. प्रमोद कोचरे साहेबश्री. संजय कुबलश्री. राजेंद्र रायका,श्री. राजू टोपिंगकट्टी,श्री. बबन सोनटक्केश्री. पिराजी लक्ष्मण सोनटक्केश्री. हनुमंत प्रकाश सोनटक्केश्री. दीपक कुडाळेइत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
सुबक नियोजन व सूत्रसंचालन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दिलीप सोनटक्के यांनी केले. त्यांनी मंडळाच्या उपक्रमांची माहिती देत उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रबद्ध व नीटनेटक सूत्रसंचालन श्री. शेखर पाटील यांनी केले.
नवरात्रोत्सवाच्या धार्मिक वातावरणात दृष्टीहीन बालगायकाचा असा यथोचित सन्मान करून त्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Advertise….


