श्री क्षेत्र दत्त देवस्थान (आडी) येथे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ सोहळा संपन्न


श्री क्षेत्र दत्त देवस्थान (आडी) येथे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ सोहळा संपन्न

केंद्रप्रमुख बाळासाहेब देसाईंचा प्रेरणादायी उपक्रम

खानापूर: राजू कुंभार

परमपूज्य परमात्माराज महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र दत्त देवस्थान, आडी (हार्दायन) येथे भाद्रपद पौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर खानापूर तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. महाराजांच्या अमृतहस्ते हा गौरव सोहळा पार पडला.

बारवाडचे सुपुत्र व केंद्रप्रमुख Tr. बाळासाहेब आप्पासाहेब देसाई  यांच्या पुढाकाराने व स्वखर्चाने मागील ५ वर्षांपासून हा सोहळा आयोजित केला जात आहे. दुर्गम भागात उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

देसाई यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून शिक्षकांना सातत्याने मार्गदर्शन करत असून देवस्थानच्या लोकोपयोगी कामांतही त्यांचा मोठा सहभाग असतो.या वर्षीचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्राप्त सर्व शिक्षकांचे तसेच हा उपक्रम राबवणारे श्री. बाळासाहेब देसाई  यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन होत आहे!

Advertise…


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!