नागुर्डा वाड्याच्या गवंड्याचा झोपेतच निर्घृण खून; गळ्यावर धारदार शस्त्राने वार


नागुर्डा वाड्याच्या गवंड्याचा झोपेतच निर्घृण खून; गळ्यावर धारदार शस्त्राने वार

कोल्हापूर / करवीर:

करवीर तालुक्यातील बलिंगा राहणारे गवंडी कामगार महादेव गवसेकर(नागुर्डा वाडा)यांचा झोपेत असतानाच गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बालिंगा व करवीर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव गवसेकर हे स्थानिक नागरिक कल्लाप्पा मळवकर यांच्याकडे गवंडी कामगार म्हणून कार्यरत होते. घटनेच्या दिवशी ते नेहमीप्रमाणे झोपलेले असताना, अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. गळ्यावर धारदार शस्त्राने खोलवर वार करण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी महादेव गवसेकर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला.

हा खून कोणत्या कारणातून झाला? वैयक्तिक वादातून की अन्य कोणत्या वैमनस्यातून? याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, या प्रकरणाचा पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत

 


109
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!