मुलांना वाचवताना आई-वडिलांचाही अंत.


खवड्या डोंगर येथील थरार ; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू.

उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार. (चंदगड,आजरा,गडहिंग्लज)

छत्रपती संभाजीनगर/वाळूज : तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी सकाळी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. कौटुंबिक वादातून घरातून निघून गेलेल्या १९ वर्षीय कुणालला समजावून घरी आणण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचाही या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. क्षणिक रागातून घडलेल्या या घटनेमुळे चांदगुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतांमध्ये कुणाल मुरलीधर चांदगुडे (१९), त्याचे वडील मुरलीधर दामोदर चांदगुडे (४८) आणि आई संगीता चांदगुडे (४२) यांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी सुमारे ११ ते १२.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशामक दल आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

कुणाल हा नीट-यूजी परीक्षेची तयारी करत होता. त्याचे वडील मुरलीधर हे ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपासून मोबाइलच्या वापरावरून व मोबाईल च्या थकलेल्या हफ्त्या वरून वडील-मुलामध्ये मतभेद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा वाद झाल्यानंतर कुणाल घरातून निघून गेल्याचे सांगण्यात येते.

मुलगा खवड्या डोंगर परिसरात गेल्याचे समजल्यानंतर त्याचे वडील त्याला समजावून परत आणण्यासाठी गेले. यावेळी आईही तेथे पोहोचली. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने  वडिलांना मुलाजवळ गेले असता दोघेही डोंगरावरून खाली कोसळले, मुलगा व पती वरून खाली पडत असताना क्षणार्धा चाही विलंब न करता आई ने सुद्धा डोंगरावरून खाली उडी घेतली व तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही सुरू केली. 


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!