चंदगडमध्ये जन्माष्टमीनिमित्त भव्य दहीहंडी सोहळा


शिवसेना महाराष्ट्र बांधकाम उद्योग सेना व प्रशांत अनगुडे युवा फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

उपसंपादक : श्री स्वप्निल कुंभार. (चंदगड, आजरा, गडहिंग्लज.)

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त शिवसेना महाराष्ट्र बांधकाम उद्योग सेना आणि प्रशांत शिवाजीराव अनगुडे युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड येथे शनिवारी दि-१२ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक परंपरेसोबतच युवकांमध्ये संघभावना, शिस्त, धैर्य, नेतृत्वगुण आणि सामाजिक एकात्मतेची भावना रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दहीहंडी हा केवळ पारंपरिक उत्सव न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा आणि युवकांच्या उत्साहाला सकारात्मक दिशा देणारा उपक्रम ठरावा, या भावनेतून आयोजन करण्यात आले आहे. गोविंदा पथकांच्या सहभागामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा धार्मिक आणि सामाजिक संदेश या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

या उपक्रमामागे प्रशांत शिवाजीराव अनगुडे यांचे सक्रिय नेतृत्व आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येत गावापासून मुंबईपर्यंतचा संघर्षमय प्रवास करत त्यांनी सामाजिक, संघटनात्मक आणि कामगार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. युवकांचे प्रश्न, बांधकाम कामगारांचे हक्क तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत.

बांधकाम क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, सामाजिक उपक्रम राबविणे आणि युवकांना संघटित करून त्यांना सकारात्मक कार्याची दिशा देणे, या माध्यमातून अनगुडे यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण केली आहे. त्याच सामाजिक बांधिलकीतून चंदगडमध्ये आयोजित करण्यात आलेला दहीहंडी सोहळा युवकांसह नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!