चंदगडमध्ये ‘महाआरोग्य शिबीर’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद.


श्री साई गणेश मंडळ आणि राजश्री बालरुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद.

​चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर ‘श्री साई गणेश मंडळ’ आणि ‘राजश्री बालरुग्णालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ‘महाआरोग्य शिबीर’ आज मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. या शिबिराला चंदगड आणि परिसरातील नागरिकांकडून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक नागरिकांनी आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करून घेतली.  

​या आरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना मोलाचे मार्गदर्शन व सल्ला दिला. यामध्ये डॉ. विवेक देसाई, डॉ. भालचंद्र पाटील, डॉ. अनिरुद्ध पेडणेकर आणि डॉ. श्रीधर बेली या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता.  

​या प्रसंगी चंदगडचे लोकप्रिय नगराध्यक्ष मा. श्री. सुनीलदादा काणेकर, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविका – सुरेश सातवणेकर, समीर नाईकवाडी, अशोक दाणी यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी, सर्व सदस्य, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

​नागरिकांनी या शिबिराला दिलेल्या उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजकांच्या वतीने उपस्थितांचे व नागरिकांचे मनापासून आभार मानण्यात आले.  


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!