अरविंद पाटील व दोड्डगौडर यांचा दणकेबाज पलटवार


अरविंद पाटील व दोड्डगौडर यांचा दणकेबाज पलटवार

चन्नराज हट्टीहोळींचे सर्व आरोप हवेत उडाले! BDCC बँक कर्ज प्रकर

कित्तूर / बेळगाव: राजू कुंभार 

मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या कर्जावरून सुरू असलेल्या राजकीय नाट्यात आता मोठा भूकंप झाला आहे! विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे धादांत खोटे आणि सत्यापासून मैलोन्मैल दूर असल्याचा घणाघाती हल्ला माजी आमदार व BDCC बँकेचे संचालक अरविंद पाटील व महांतेश दोड्डगौडर यांनी चढवला आहे. नुकताच कित्तूर येथे यासंदर्भात पत्रकात परीषद झाली.

“१५ एप्रिलच्या बैठकीत स्वतः स्वाक्षरी केली अन् आता राजकीय नाटक?”

पत्रकार परिषदेत बोलताना दोड्डगौडर यांनी थेट बॉम्बच फोडला. १५ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या बैठकीत मलप्रभा साखर कारखान्याचा कर्ज अर्ज पुढे ढकलण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला होता. विशेष म्हणजे, या बैठकीला हट्टीहोळी स्वतः उपस्थित होते! “जर विरोध होता, तर बैठकीत तोंड का उघडले नाही? शांतपणे ठरावावर स्वाक्षरी करून आता बाहेर येऊन आमचा बळी देण्याचा केविलवाणा प्रयत्न कशासाठी?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

२०११ मध्येच कारखान्याने सभासदत्व गुंडाळले!

दोड्डगौडर यांनी आणखी एक खळबळजनक बाब समोर आणली आहे. ज्या कारखान्याला कर्ज हवे आहे, त्या मलप्रभा साखर कारखान्याने २०११ मध्येच BDCC बँकेचे आपले सभासदत्व (मेम्बरशिप) रद्द करून टाकले आहे! नियम धाब्यावर बसवून बिन-सभासदाला कर्ज कसे काय दिले जाऊ शकते?

“३५ वर्षांच्या अनुभवावर बोट दाखवाल तर सोडणार नाही!”

“मी सहकार क्षेत्रात ३५ वर्षे घालवली आहेत. कोणाचे कर्ज अडवणे हा माझा उद्देश नाही, पण नियमांची पायमल्ली खपवून घेणार नाही,” असा इशारा देत दोड्डगौडर यांनी आव्हान दिले की, हट्टीहोळींमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठांच्या समक्ष समोरासमोर चर्चेला यावे!

या खळबळजनक पत्रकार परिषदेमुळे बेळगावच्या राजकीय अन् सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून आता चन्नराज हट्टीहोळी यावर काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!