आंबोळी प्राथमिक शाळेच्या समस्यांवर तातडीने कारवाई;
खानापूर तालुका शिक्षणाधिकाऱ्यांकडून थेट शाळेची पाहणी!
जांबोटी / प्रतिनिधी:
जांबोटी येथील ‘प्रजा सेवा’ प्राथमिक मराठी शाळेच्या विविध अडीअडचणी आणि समस्यांबाबत एसडीएमसी कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेत खानापूर तालुक्याचे शिक्षणाधिकारी यांनी आंबोळी शाळेला ताबडतोब भेट देऊन समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तालुका शिक्षण अधिकारी पदभार असणारे एम जी हत्ती, बी ए जकाती, शंकर कमार, संतोष नाईक, अजमल पटेल आदी उपस्थित होते.
आंबोळी शाळेतील वर्गखोली आणि पाण्याची टाकी फुटलेली आहे.तसेच रंगरंगोटी आणि पेव्हर्स बसविण्यासह अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करा अशा मागणींचे निवेदन एस डी एम सी व ग्रामस्थांनी दिले होते. त्या अनुषंगाने, शैक्षणिक अडचणी आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी ही धावती भेट दिली. ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने मांडलेल्या प्रश्नांवर योग्य ती सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. शिक्षणाधिकाऱ्यांच्या या तत्पर कारवाईबद्दल जांबोटी आणि आंबोळी परिसरातील पालकांसह ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
या पाहणी प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा चोर्लेकर, उपाध्यक्षा रेणुका अशोक दळवी, कमिटीचे सदस्य अर्जुन नाईक, सागर नाईक, युवा कार्यकर्ते दीपक शास्त्री, ओमाण्णा नाईक, शंकर शास्त्री, बबन नाईक, नारायण शास्त्री, रामलिंग नाईक, मारुती श. नाईक, वसंत शास्त्री, अरुण पाटील, सचिन सं. नाईक, नंदकुमार चोर्लेकर, विठ्ठल शास्त्री, सुरेश शास्त्री, हनुमंत नाईक, सुरेश नाईक, शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांच्यासह इतर कमिटी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertise…



