कनकुंबी प्राथमिक कृषी पतीन सोसायटीआमटे ची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू


कणकुंबी प्राथमिक कृषी पतीन सोसायटीआमटे ची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तारीख जाहीर!

खानापूर: कृष्णा भरणकर 

माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काही काळापासून स्थिरावलेली आणि वादग्रस्त ठरलेली तालुक्यातील आमटे येथील ‘दि कनकुंबी प्राथमिक कृषी पत सहकारी सोसायटी लि.’ च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया आता पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली आहे. न्यायालयाची स्थगिती अधिकृतपणे उठवल्यानंतर, ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया थांबवली होती, त्याच टप्प्यापासून पुढील हालचालींना वेग आला आहे.

यापूर्वी २३ मार्च २०२६ रोजी निवडणुकीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, पहिल्या दिवशी अर्ज भरल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या डब्ल्यू.पी. क्रमांक १०२९४६/२०२६ (दिनांक १०-०४-२०२६) नुसार स्थगनादेश दिल्यामुळे प्रक्रिया थांबवण्यात आली होती.

स्थगिती उठवण्याचे आदेश:दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी उच्च न्यायालयाने स्थगिती उठवून, निवडणूक ज्या टप्प्यावर थांबली होती तिथूनच ती पुढे चालवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

एकूण जागा आणि आरक्षण: सोसायटीच्या एकूण १२ जागांसाठी ही निवडणूक होत असून, यात कर्जदार क्षेत्रातून ११ आणि गैर-कर्जदार क्षेत्रातून १ जागा समाविष्ट आहे.

कर्जदार क्षेत्रात सर्वसाधारण जागांसह अनुसूचित जाती (१), अनुसूचित जमाती (१), मागासवर्गीय ‘अ’ प्रवर्ग (१), मागासवर्गीय ‘ब’ प्रवर्ग (१) आणि महिला सदस्यांसाठी २ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत

निवडणुकीचे महत्त्वाचे वेळापत्रक:

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आरंभ: १५-११-२०२६ (सोसायटीच्या कार्यालयात सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत)

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत:२१-११-२०२६

उमेदवारी अर्जांची छाननी: २२-११-२०२६

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख:२३-११-२०२६

मतदानाचा दिनांक व वेळ:२९-११-२०२६ (सकाळी ९:०० ते संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत)

मतदानाचे ठिकाण:सरकारी प्राथमिक शाळा, आमटे

मतमोजणी व निकाल: २९-११-२०२६ रोजी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच सुरू होईल.

या सर्व निवडणुकीची सविस्तर माहिती सोसायटीचे निवडणूक अधिकारी तथा सहकार संस्थांचे साहाय्यक संतोष पी. हेगडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!