न्हावी (सविता)समाजातील तरुणांना सलून सुरू करण्यासाठी १० लाखांपर्यंत कर्ज व २ लाखांपर्यंत सबसिडी


न्हावी (सविता)समाजातील तरुणांना सलून सुरू करण्यासाठी १० लाखांपर्यंत कर्ज व २ लाखांपर्यंत सबसिडी

२५ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी

राजू कुंभार: नागुर्डा 

कर्नाटक न्हावी /सविता समाज अभिवृद्धी निगमतर्फे २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठी सविता समाजातील नागरिकांना सलून सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणाऱ्या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ४ टक्के व्याजदराने १० लाख रुपयांपर्यंत कर्ज आणि कमाल २ लाख रुपयांपर्यंत सबसिडी (सह अनुदान) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २५ डिसेंबर २०२६ ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

Advertise

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

कर्ज व अनुदान मर्यादा: सलून सुरू करण्यासाठी ४ टक्के व्याजदराने १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. एकूण कर्ज रकमेच्या २० टक्के म्हणजेच कमाल २ लाख रुपयांपर्यंत सह अनुदान दिले जाईल.

तारण अट: लाभार्थ्यांना कर्जाच्या रकमेइतकी स्थावर मालमत्ता निगम कडे गहाण ठेवणे आवश्यक राहील.

पात्रतेचे निकष

अर्जदार न्हावी,सविता, परियाळ, अंबट्टन, भजंत्री, भंडारी, चौरिया, कव्हटियन, केलसी, क्षौरिक, क्षौरद, महाले, मंगळ, मेलागार, नाडिग, नापित, नवलीग, नावी, नयनज क्षत्रीय/क्षत्री, वाझांत्री नाडिग किंवा क्षौरिक यापैकी संबंधित जातीतील असावा.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३,५०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे.

अर्जदाराचे वय ५५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

अर्ज प्रक्रिया व संपर्क

इच्छुक पात्र अर्जदारांनी सेवा-१ सेवासिंधू पोर्टल ([https://sevaone.karnataka.gov.in](https://sevaone.karnataka.gov.in)) द्वारे किंवा ग्राम वन, बेंगळूरु वन व कर्नाटक वन सेवा केंद्रांमार्फत सेवा-वन प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी निगमचे अधिकृत संकेतस्थळ www.kssd.karnataka.gov.in पाहावे किंवा निगमच्या ०८०-२२३७४८३२, ८०५०७७०००४ अथवा ८०५०७७०००५ या हेल्पलाईन क्रमांकांवर अथवा संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक श्री. नटराज जी. आर., के.ए.एस. यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Advertise

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!