रामगुरवाडीत गुरुवारी भव्य बैलगाडी शर्यत!


रामगुरवाडीत गुरुवारी भव्य बैलगाडी शर्यत!

दोन गटात होणार स्पर्धा 

राजू कुंभार: नागुर्डा

रामगुरवाडी(ता.खानापूर)येथे दिवाळीच्या विशेष निमित्ताने श्री गोधनगुरु शर्यत प्रेमी यांच्या सौजन्याने एका बैलगाडीची (गाडा) चाके न बांधता बैलजोडीने ओढण्याची ‘भव्य जंगी शर्यत’ गुरुवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे स्वरूप व वैशिष्ट्ये:

या शर्यतीमध्ये बैलगाडीची चाके न बांधताबैलजोडी पळवली जाणार आहे. ग्रामीण संस्कृतीचा हा पारंपरिक खेळ पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी बेळगावसह खानापूर तालुक्यातील बैलगाडी मालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या केले आहे.

गटनिहाय आकर्षक रोख बक्षिसे:

या शर्यतीत विजेत्या बैलजोड्यांसाठी रोख रकमेची मोठी बक्षिसे आणि आकर्षक ट्रॅफिसची (मानचिन्ह) व्यवस्था करण्यात आली आहे:

१. लहान गट (प्रवेश फी: ₹ १५००/-)

* प्रथम पारितोषिक: ₹ २१,००१/-

* द्वितीय पारितोषिक: ₹ १६,००१/

* तृतीय पारितोषिक: ₹ १४,००१/-(आमदार श्री. विठ्ठल सोमाण्णा हलगेकर यांच्यातर्फे ₹ ५१,००० तिन्ही बक्षिसे देण्यात आली आहेत)

 

* चौथे पारितोषिक: ₹ ११,००१/- (श्री. शंकर विष्णू चौगुले, प्रगतशील शेतकरी, हलकर्णी)

* पाचवे पारितोषिक: ₹ ८,००१/- (तन्वी कंस्ट्रक्शन, जी. एम. कंस्ट्रक्शन)

* सहावे पारितोषिक: ₹ ७,००१/- (ऐश्वर्या शिवा मयेकर, माजी ग्रामपंचायस सदस्य रामगुवाडी)

* सातवे पारितोषिक: ₹ ६,००१/- (बाबाजान मुल्ला, भाताचे व्यापारी)

* आठवे पारितोषिक: ₹ ५,००१/- (श्री. गंगाराम नामदेव चौगुले, आर्मी, रुमेवाडी)

* नववे पारितोषिक: ₹ ४,००१/- (श्री. सुरेश होनगेकर, प्रगतशील शेतकरी, खानापूर)

* दहावे पारितोषिक: ₹ ३,००१/- (श्री. नागेश महादेव हेब्बाळकर, लक्ष्मी सप्लायर्स हेब्बाल)

* अकरावे पारितोषिक: ₹ २,५०१/- (श्री. मौलेश होसमनी, दूध उत्पादक)

* बारावे पारितोषिक: ₹ २,५०१/- (शकीब, गांधीनगर इलेक्लस)

* तेरावे पारितोषिक: ₹ २,१०१/- (हारीश एम., व्यापारी, बेळगाव)

* चौदावे पारितोषिक: ₹ २,००१/- (श्री. यलाप्पा कोनेरी गुरव, रेणुका एजन्सीज)

* पंधरावे पारितोषिक: ₹ २,००१/- (श्री. अमित कोमाना,)

* सोळावे पारितोषिक: ₹ २,००१/- (श्री. संदीप मिनाजी कुलम)

* विशेष सन्मान: लहान गटातील १ ते ५ विजेत्या जोड्यांना ‘नवीन मेनसे सिविल इंजिनियर हलकर्णी’ यांच्यातर्फे विशेष ट्रॉफी भेट दिली जाईल.

२. मोठा गट (प्रवेश फी: ₹ २५००/-)

* प्रथम पारितोषिक: ₹ ३१,००१/- (श्री. अरिवंद चंद्रकांत पाटील, माजी आमदार, खानापूर)

* द्वितीय पारितोषिक: ₹ २५,००१/- (श्री. प्रविण आगनोजी, माजी ग्रा.पं. अध्यक्ष हलकर्णी)

* तृतीय पारितोषिक: ₹ २१,००१/- (श्री. परशराम रामचंद्र ठोंबरे, रेणुका ॲक्वटोन्स रामगुवाडी)

* चौथे पारितोषिक: ₹ १५,००१/- (श्री. सुरेश नारायण देसाई, भा.ज.पा. ग्रामीण प्रभारी, बेळगाव)

* पाचवे पारितोषिक: ₹ १२,००१/- (श्री. नागेश पारवडकर, एस. एन. मोटर्स)

* सहावे पारितोषिक: ₹ ९,००१/- (श्री. शांताराम गंगाराम हेब्बाळकर यांच्यातर्फे आणि श्री. मोहन नाईक, मारुती इंडस्ट्रीज)

* सातवे पारितोषिक: ₹ ८,००१/- (श्री. कुलदीप जाधव, श्री. पांडुरंग मळवकर)

* आठवे पारितोषिक: ₹ ७,००१/- (श्री. रूपेश बिर्रे,)

* नववे पारितोषिक: ₹ ६,००१/- (श्री. महेश मुतगेकर)

* दहावे पारितोषिक: ₹ ५,००१/- (श्री. मारुती जीवाप्पा तोपिनकट्टीकर)

* अकरावे पारितोषिक: ₹ ४,००१/- (श्री. मारुती देवाप्पा गुरुव)

* बारावे पारितोषिक: ₹ ३,००१/- (श्री. विठ्ठल नामदेव पाटील)

* विशेष सन्मान: मोठ्या गटातील १ ते ५ विजेत्या जोड्यांना देखील ‘नवीन मेनसे सिविल इंजिनियर हलकर्णी’ यांच्यातर्फे आकर्षक ट्रॉफी प्रदान केली जाईल.

ग्रामीण भागातील जनावरांच्या या पारंपरिक शर्यतीचा आनंद घेण्यासाठी आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचेआवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertise

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!