गोसावी नाथ मंदिरातील शिबिरात विविध आजारांवर उपचार; ५०० हुन अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.
गडहिंग्लज परिसरातील वडरगे येथील गोसावी नाथ मंदिराच्या प्रांगणात स्वराज्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने नुकतेच एकदिवसीय मोफत आरोग्य शिबिर गुरुवार दि. २९ ऑक्टोंबर रोजी अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. या विशेष आरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील पाचशेहून अधिक नागरिकांनी घेतला असून, उपस्थितांची मोठ्या प्रमाणावर आरोग्य तपासणी करण्यात आली.

विविध आजारांची मोफत तपासणी व औषध वाटप :
या शिबिरामध्ये रक्तदाब (ब्लड प्रेशर), इसीजी (ECG), पोटाचे विकार, हाडांचे आजार तसेच लहान मुलांच्या विविध आजारांवर मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या सर्व रुग्णांना हॉस्पिटलच्या वतीने मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.

यावेळी हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध असणाऱ्या विविध आरोग्य सेवांची माहिती देण्यात आली, ज्यामध्ये जनरल मेडिसिन, अतिदक्षता विभाग, अस्थिरोग ट्रॉमा सेंटर, जनरल सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, बाळरोग, नाक-कान-घसा विभाग, स्त्रीरोग विभाग, फिजिओथेरपी, मूत्ररोग तज्ज्ञ, डायलिसिस विभाग आणि आहार तज्ज्ञ यांसारख्या सेवांचा समावेश आहे.

आरोग्य योजना बद्दल माहिती:
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या विविध आरोग्य सेवांच्या विनामूल्य लाभाविषयी माहिती देण्यात आली. शिबिराची सविस्तर माहिती डॉ. सुरेखा अजित पाटोळे यांनी दिली.

