चंदगड पोलीस ठाण्यात मयत नोंद; पोलिसांकडून तपास सुरू.
चंदगड (प्रतिनिधी): श्री स्वप्निल कुंभार.
चंदगड तालुक्यातील कुदनूर येथे एका ४४ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिद्धाप्पा मारूती शहापुरकर (वय ४४, रा. कुदनूर, ता. चंदगड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुदनूर येथील राहत्या घरातील परड्याकडील खोलीत शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.०० ते रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सिद्धाप्पा शहापुरकर यांनी छताच्या लाकडी वासाला नॉयलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेबाबत मृत व्यक्तीचा मुलगा समर्थ सिद्धाप्पा शहापुरकर (वय २१, रा. कुदनूर, सध्या रा. उचगाव, ता. जि. बेळगाव) याने चंदगड पोलीस ठाण्यात वर्दी दिली. दिलेल्या माहितीवरून चंदगड पोलिसांत मयत रजि.क्र. ६१/२०२६, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच प्राथमिक तपासासाठी मद्दतीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील (बॅच क्र. १३४९) यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नाईक (बॅच क्र. ३८९) करत आहेत.

