१५ वर्षीय मुलगी बेपत्ता प्रकरणी चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल


बेपत्ता मुलीचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान; अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाई.

चंदगड, प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक येथून १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी चंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,

राजगोळी बुद्रुक येथील एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून नेल्याचा आरोप तिच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केला आहे. तसेच घरातील कपाटात ठेवलेले कपडे, शालेय पुस्तके आणि मुलीच्या नावाची कागदपत्रेही सोबत नेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीनुसार चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३८/२०२६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!