प्रा. राजेंद्र एस. पाटील यांना ‘VK Excellence & Honor’ पुरस्कार


प्रा. राजेंद्र एस. पाटील यांना ‘VK Excellence & Honor’ पुरस्कार

खानापूर / वर्षा कुंभार 

शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल खानापूरचे प्रा .राजेंद्र एस. पाटील यांना ‘The Times of India आणि विजय कर्नाटक’यांच्या संयुक्त विद्यमाने VK Excellence & Honor – Teachers & Educationists (North Karnataka Edition)’हा राज्य स्तरीय प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रा. पाटील हे शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, खानापूरचे संस्थापक सचिव, ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगावचे उपाध्यक्ष आणि माजी प्राचार्य – शेख पीयू कॉलेज, बेळगाव म्हणून काम पाहिले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.

त्यांच्या या यशाबद्दल खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, महालक्ष्मी ग्रुप, तोपिनकट्टी तसेच शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या शिक्षकवृंदाकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Advertise


106
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!