
घरफोडी करणारे चोर नंदगड पोलिसांनी पकडले
२२ ग्रॅम सोने आणि २ दुचाकींसह चार अट्टल घरफोड्यांना अटक
खानापूर -राजू कुंभार
खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी चार अट्टल चोरट्यांना गजाआड करण्यात आले असून त्यांच्याकडून २२ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. हणमंत जोरगी मुर्गी (रा. बेळवाडी)
२. मंजुनाथ नागराज बाडगी (रा. धारवाड)
३. दुर्गाप्पा शिवप्पा
४. शंकर यल्लाप्पा करी (रा. शिग्गाव)
कारवाईचा तपशील:
नांदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटनांनंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास तीव्र केला होता. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्यांनी घरफोडीची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून लाखो रुपयांचे २२ तोळे सोने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत (कारागृहात) करण्यात आली आहे. नांदगड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून, पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.


