बुद्धीबळाच्या पटलावर चमकली चंदगडची कन्या!


फादर अग्नेल स्कूलची विद्यार्थिनी निधी पोटे हिची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

​चंदगड प्रतिनिधी: श्री. स्वप्निल कुंभार.

        क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तर शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा २०२६-२७’ मध्ये फादर अग्नेल स्कूल, चंदगडची विद्यार्थिनी कुमारी निधी रत्नाकर पोटे हिने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. १४ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये निधीने तृतीय क्रमांक पटकावून सांगली येथे होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.  

​तिच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा व चंदगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. निधीच्या या शालेय यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या जात आहेत.  

​निधीला हे यश मिळवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक फादर संतोष डिसोजा, फादर सेलवण, फादर लॉन्जिनस, क्रीडा शिक्षक इम्रान पठाण आणि सर्व शिक्षक वृंदाचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. निधीच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन होत आहे.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!