
डॉ. निंबळकरानी कारखाना सुरू करून ३००-४०० जणांना नोकरी द्यावी; आमदार हलगेकरांचे थेट चॅलेंज
खानापूर : राजू कुंभार
तुमचा डॉ.अंजलीताई केन्स प्रा.ली कारखाना सुरू करा आणि ३००-४०० जणांना रोजगार द्या’ असे आव्हान त्यांनी दिले.महालक्ष्मी ग्रुपच्या माध्यमातून शेकडो लोकांना रोजगार दिल्याचा दावा करत, “तुम्ही किती लोकांना रोजगार दिला, ते स्पष्ट करा,” असे आव्हानही त्यांनी दिले.
भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखाना बिकट परिस्थितीतही सामान्य शेतकऱ्यांच्या सेवेसाठी घेतल्याचा दावा हलगेकरांनी केला. या कारखान्याबाबत आपल्यावर ६०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, त्यानंतर न्यायालयीन चौकशी आणि लोकायुक्त चौकशी लावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कुसमळी प्रकल्प
“सरकार काँग्रेसचे, मॅडम काँग्रेसच्या आणि खानापूर तालुक्याचे पाणी घेऊन जाणारेही काँग्रेसचेच. आमच्या पत्रामुळे एखाद्या अधिकाऱ्याची साधी बदली होते का, . साधी बदली होत नसेल तर माझ्या विरोधामुळे प्रकल्प कसा जाईल?” असा सवाल करत हलगेकरांनी निंबाळकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हिडकल धरणातून धारवाडला पाणी नेण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी टीका केली. मेजर इरिगेशन आणि मायनर इरिगेशनशी संबंधित मंत्री हिडकल धरणातून धारवाडला पाणी नेत असताना त्यावेळी विरोध का झाला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रस्ते, अंगणवाडी आणि शेतकरी प्रश्नांवरही भाष्य
फिश मार्केट रस्त्याचा प्रश्न शेतकरी आणि स्थानिकांच्या सहकार्याने न्यायप्रविष्ट असतानाही मार्ग मोकळा केल्याचे हलगेकरांनी सांगितले. शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अंगणवाडीच्या मंजुरीबाबत बोलताना मागील वेळी १३ आणि आता ७ अंगणवाड्या मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ४७ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत हेस्कॉमला पत्र दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘आमदार होण्यासाठी प्रयत्न करा; जनतेने तुम्हाला नाकारले’
पत्रकार परिषदेत हलगेकरांची भाषा आक्रमक राहिली. “आमदार होण्यासाठी प्रयत्न करा. आमदार होऊनही तुम्हाला जनतेने रिजेक्ट केले आहे. त्यामुळे घरी गप्प बसा,” अशी बोचरी टीका त्यांनी निंबाळकरांवर केली.
दरम्यान, विविध रस्ते आणि मंदिरांना अनुदान दिल्याची माहिती हलगेकरांनी दिली; मात्र पत्रकार परिषदेत त्यासंदर्भातील लेखी कागदपत्रे किंवा तपशील सार्वजनिक करण्यात आले नसल्याचे दिसून आले.
वाळूच्या हप्त्यांवरूनही आरोप-प्रत्यारोप
स्थानिकांकडून वाळूचे हप्ते सुरू करून त्यांची लूट केल्याचा आरोप हलगेकरांनी केला. मात्र या आरोपांना आधार देणारे ठोस पुरावे पत्रकार परिषदेत सादर झाले की नाही, याबाबत स्पष्टता राहिली.
निंबाळकरांच्या आरोपांना उत्तर देताना हलगेकरांनी अनेक गंभीर दावे आणि आरोप केले असले, तरी त्यातील प्रत्येक दाव्याची स्वतंत्र कागदपत्रे किंवा अधिकृत आकडेवारी समोर आल्यासच या आरोप-प्रत्यारोपांचे वास्तव स्पष्ट होणार आहे. त्यामुळे खानापूरच्या राजकारणात आता ‘आरोप विरुद्ध प्रत्युत्तर’ या संघर्षाला आणखी धार आली आहे.




