जंगमहट्टी अपहरण प्रकरणात खुनाच्या कटाचा संशय

चंदगड : स्वप्नील हणमंत कुंभार
चंदगड तालुक्यातील जंगमहट्टीतील अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची खळबळजनक घटना 29 ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणी चंदगड पोलीसानी तीन तरुण मुलांना अटक केली असून खून करण्यासाठी संगनमत करून अपहरण केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
२९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता हर्षद प्रकाश हुंदळेकर (वय १७ वर्षे ४ महिने) रा.जंगमहट्टी याचे अज्ञातांनी फूस लाऊन अपहरण केले असल्याची तक्रार आई योगिता प्रकाश हुंदळेकर यांनी पोलिसात केली होती.या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बुधवार दि.2 सप्टेंबर रोजी चंदगड पोलिसांनी तपास गतिमान करत सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी 1. कीर्ती कुमार रामू कुठरे (वय 28 वर्षे) 2. दिलीप लक्ष्मण कुटरे (वय 29 वर्षे) 3. श्रीनाथ मधुकर नागुर्डेकर( वय 24 वर्षे)सर्व राहणार जंगम हट्टी.ता चंदगड यांना अटक करण्यात आले आहे.
तसेच 294/2026 bns 137(2) या अपहरणाच्या गुन्ह्यात बुधवारी BNS कलम 140(1), 3(5) हे खून करण्यासाठी संगनमत करून अपहरण केले बाबत कलम वाढ करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास API पोवार (चंदगड पोलीस ठाणे) हे करीत आहेत .




