कर्तव्यनिष्ठ होमगार्ड आण्णासो खानापुरे यांचा सेवापूर्ती गौरव


गडहिंग्लज प्रतिनिधी :(संपत सावंत) 

गडहिंग्लज पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून तब्बल ३५ वर्ष निष्ठेने व सचोटीने सेवा बजावणारे असि. लीडर होमगार्ड आण्णासो दुंडाप्पा खानापुरे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमेश पाटील होते. 

स्वागत व प्रास्ताविक आण्णासो भोसले यांनी केले. संपत सावंत यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी बोलताना सतीश होळकर म्हणाले,’ खानापुरे यांनी आपल्या सेवेत निष्कलंक प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांनी संघर्षमय परिस्थितीतही न डगमगता आपल्या कर्तव्याला सर्वोच्च स्थान दिले. त्यांनी अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड दिले. नशिबापेक्षा कर्तुत्वावर आणि भाग्यपेक्षा परिश्रमावर विश्वास ठेवत अविरत निस्पृहपणे सेवा बजावली.त्यांच्यातील वक्तशीरपणा, हजरजबाबीपणा, धाडसी स्वभाव हे गुण आम्हां सर्वांसाठी आदर्शवत असल्याचेही त्यांनी सांगितले.डॉ. रमेश पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून ३५ वर्षाची सेवा ही केवळ कर्तव्यपूर्ती नसून नव्या पिढीसाठी प्रामाणिकपणा, जिद्द आणि समर्पणाचा प्रेरणादायी आदर्श असल्याचे सांगितले. 

यावेळी सौ. पल्लवी पवार, सागर पाटील, ट्रॅफिक इन्चार्ज सुहास शिंदे, राजेश पाटील, अभिजीत पाटील, दत्ता शिंदे, सौ. रेश्मा नाईक, रमेश मोरे, रामदास किल्लेदार,दादू खोत, सौ.डी.बी.करडे ,सुनील पाटील, मल्लाप्पा कोचरी, काशिनाथ चौगुले,सौ. प्रियंका इंगवले ,काशिनाथ स्वामी, मलगोंडा पाटील अमृत सावंत, सुरेश चौगुले अशोक वाडकर, अशोक कलाज, अर्जुन मोरे,, आप्पासो चौगुले, सुरेश गुडदे व राजू वाडकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरारी लोहार यांनी तर राजू भोजणे यांनी आभार मानले.


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!