व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी उप्पिन तर उपाध्यक्ष पदी काद्रोळी
घाऊक संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड
खानापूर: राजू कुंभार
खानापूर शहरात शुक्रवारी झालेल्या तालुका घाऊक व्यापारी संघाच्या (डिस्ट्रीब्युटर्स संघ) पदाधिकाऱ्यांच्या सभेत २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वसहमती निवड करण्यात आली आहे. रविसागर उप्पिन यांची अध्यक पदी तसेच ईश्वर काद्रोळी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कार्यकारी सचिव: रहीमु शेख,खजिनदार:अल्ताफ मुल्ला व सल्लागार म्हणून महंतेश सोनोळी व रमेश पाटील यांचीही निवड झाली आहे.
तसेच सदस्य पदी अनंत देसाई, जीवन मोरे, आदित्य कलाल, राहुल जवळी, रोहन कलाल, जावेद खलिफा, दिनेश निलजकर, सुरेश कोटीमकर, सागर निलजकर, मारुती गुरव, पुंडलिक शिरोळे, युनूस कुरगुंड, हर्ष माने, शिरीष देसाई, अल्ताफ मोकाशी, मिलिंद बिरसे, राजेश देसाई आदींची निवड झाली.
सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड अत्यंत सलोख्याच्या वातावरणात व सर्वानुमते करण्यात आल्याची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
घाऊक व रिटेल व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य:
निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष रविसागर उप्पिन यांनी सांगितले की, घाऊक व्यापाऱ्यांच्या विविध समस्या आणि राष्ट्रीय मार्केटमध्ये वेगाने होणारे बदल लक्षात घेता, तालुक्यातील सर्व रिटेलर (किरकोळ) व्यापाऱ्यांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी संघटना सदैव प्रयत्नशील राहील.

जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील

खजिनदार अल्ताफ मुल्ला

सेक्रेटरी रहिम शेख
Advertise

Advertise


