तालुकास्तरीय शालेय १४ वर्षांखालील ४६ किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत प्रथम व थाळी फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक.
गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.
हलकर्णी भाग हायस्कूल, हलकर्णी येथील विद्यार्थिनी कु. वल्लरी विलास भोगाणे हिने १४ वर्षांखालील मुलींच्या ४६ किलो वजनी गटातील गडहिंग्लज तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच 14 वर्षाखालील मुलींच्या थाळीफेक स्पर्धेमध्ये देखील प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

वल्लरी हिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान संपादन केला. तिच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील गौरवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. बी. पाटील, क्रीडा शिक्षक श्री. एस. बी. पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

