
आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून कुपटगिरीतील शेतकऱ्याला आर्थिक मदत
खानापूर: राजू कुंभार
कुपटगिरी (तालुका खानापूर) येथील शेतकरी रवळू शंकर पाटील यांच्या शर्यतीच्या बैलाचा अपघातात गंभीर दुखापत होऊन पाय निकामी झाला होता. या घटनेमुळे शेतकरी पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या परिस्थितीची दखल घेत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी रवळू पाटील यांना आर्थिक मदत केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बैलाला नाल बसवण्यासाठी घेऊन जात असताना वाटेत अचानक दोरी सुटल्यामुळे तो धावत सुटला. धावपळीच्या वेळी उंचावरून उडी मारल्याने बैलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
या घटनेनंतर आमदार हलगेकर तसेच भाजप रयत मोर्चाचे उपाध्यक्ष सदानंद पाटील यांनी रवळू पाटील यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला व आर्थिक मदत सुपूर्द केली. या वेळी शंकर पाटील, तानाजी पाटील, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.
Advertise….


