बागिलगे गावाच्या सुपुत्राच्या निधनाने पंचक्रोशीवर शोककळा; शनिवारी मूळ गावी पार पडणार अंतिम संस्कार
चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.
५४ व्या बटालियन, एसएसबी (SSB), बिजनी (आसाम) येथे कार्यरत असलेले आणि चंदगड तालुक्यातील बागिलगे गावचे सुपुत्र वीर जवान सीटी/जीडी मोहन परशराम गोविलकर (गोईकर) यांचे १५ ऑक्टोबर २०२६ रोजी उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

कर्तव्य बजावत असताना व उपचाराधीन असताना झालेल्या त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बागिलगे गावासह संपूर्ण चंदगड तालुक्यात आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. एका कर्तव्यदक्ष जवानाच्या अकस्मात जाण्याने परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोकककल, स्तब्धता पसरली आहे.
त्यांचे पार्थिव शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे पुणे विमानतळावर दाखल होणार आहे. तेथून लष्करी इतमामात त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी बागिलगे (पोस्ट: दुक्करवाडी, तालुका: चंदगड) येथे आणले जाईल.
त्यानंतर बागिलगे येथील त्यांच्या निवासस्थानी गावकऱ्यांना व नातेवाईकांना अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल आणि शासकीय लवाजम्यात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार पार पडतील.

