नवरात्रोत्सवात झुडुपात मुलीवर लैंगिक अत्याचार


नवरात्रोत्सवात झुडुपात मुलीवर लैंगिक अत्याचार

(राजू कुंभार: नागुर्डा)

नवरात्रोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादरम्यान दांडिया-गरबासारखे पारंपरिक नृत्य आयोजित केले जातात. मात्र याच्या आडून नराधमांकडून दरवर्षी महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना समोर येतात. नुकताच मन सुन्न करून टाकणारा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गा देवीच्या मंडपातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले; नंतर त्याच मुलीवर नातेसंबंधाने काका असणाऱ्या व्यक्तीने झुडुपात नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील असून या घटनेने परिसर हादरून गेला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुलीच्या घराजवळच देवीचा मंडप होता. याचदरम्यान चिमुकली घराजवळच्या मंडपात गेली होती. एका शेजाऱ्याने पीडितेला फसवून उचलून नेले. त्यानंतर तिला झुडुपात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. कुटुंबीयांना मुलगी इकडे-तिकडे दिसत नसल्याने चिंता वाटू लागली. त्यानंतर त्यांनी मुलीचा शोध घेणे सुरूच ठेवले. यादरम्यान आरोपी नराधम मुलीसोबत झुडुपात आढळून आला.

आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा
कुटुंबीयांच्या सूचनेनुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीनंतर पीडितेला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. अशातच आरोपी हा केवळ त्यांचा शेजारीच नाही, तर त्या निष्पाप मुलीचा काकादेखील आहे.
संबंधित प्रकरणात शहर पोलीस अधिकारी असलेले सम्यक चौधरी यांच्या माहितीनुसार, आरोपीला घटनास्थळावरून अटक करण्यात आली. त्याची ओळख पीडितेचा शेजारी सूरज निषाद अशी पटली आहे. घटनेदरम्यान आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने मुलीला नदीच्या किनाऱ्यावरील एका झुडुपात फसवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, आरोपीविरुद्ध याआधीदेखील अशा घटनांबाबत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दुर्गा देवीच्या उत्सवात सर्वत्र दांडियाचे कार्यक्रम होतात. यादरम्यान अनेक अश्लील व अनुचित प्रकार उत्सव संपल्यानंतर उघडकीस येतात. दांडियाच्या नावावर अनेक प्रकार अढळून येतात.त्यामुळे अशा उत्सवांचे पावित्र्य कमी होत चालले आहे.

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!