MPSC अभियांत्रिकी सेवा स्पर्धापरीक्षा पूर्व प्रशिक्षणाची संधी


MPSC अभियांत्रिकी सेवा स्पर्धापरीक्षा पूर्व प्रशिक्षणाची संधी

मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन; 23ऑगस्ट पर्यंत मुदत 

श्री.स्वप्निल कुंभार(उपसंपादक- चंदगड, आजरा व गडहिंग्लज)

  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना मोफत पूर्व परीक्षा प्रशिक्षण आणि विद्यावेतन दिले जाते, त्या करिता टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत व आर्टी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, (टीआरटीआय), पुणे यानी यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत, व आर्टी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प, योजना राबविल्या जातात. तसेच सदर लाभार्थी गटातील युवक आणि युवतीकरिता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. सदर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार उक्त संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी सन २०२६-२७ या वर्षासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी) योजनेकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व मार्गदर्शन देऊन शासकीय नोकरीची संधी मिळावी, म्हणून खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत.

        सदर योजनेचा सविस्तर तपशील, शासन निर्णय आवश्यक कागदपत्रे इ. बाबतच्या अधिक माहितीकरिता कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ http://trti.maharashtra.gov.in ला भेट देऊन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरूनच ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावेत. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड ही सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test -CET) व्दारे गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे.

 

पात्र व इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, आरक्षण व सीईटीमधील प्राप्त गुणांनुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम संनियंत्रण व अंमलबजावणी समिती यांचेकडे राहतील.अर्ज करण्याचा सुरू दिनांक:- ९/८/२०२६ अर्ज करण्याचा अंतिम दिनांकः-२३/८/२०२६ आहे विद्यार्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.नीलेश सागर, (भा.प्र.से.आयुक्त, टीआरटीआय पुणे तथा अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम संनियंत्रण व अंमलबजावणी समिती) यांनी केले आहे.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!