
काटगाळीत महालक्ष्मी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त तालुकास्तरीय संगित भजनी स्पर्धेचा दिमाखदार सोहळा!
राजू कुंभार: नागुर्डा
काटगाळी (ता. खानापूर) येथे खास श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त दि. ०२-१२-२०२६ रोजी संध्याकाळी श्री महालक्ष्मी भजनी मंडळ यांच्या सौजन्याने तसेच ग्रामस्थ व पंचकमिटीच्या वतीने खानापूर तालुका मर्यादित ‘संगित भजनी स्पर्धेचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर व माजी आमदार व DCC संचालक अरविंद पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष स्थानी मीनाजी पुंडलिक चौगुले हे राहणार आहेत.विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विविध फोटो पूजन होणार आहे.
पारंपरिक भक्तीरस, सुगम संगीताची गोडी आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या स्पर्धेचा लाभ हौशी स्पर्धक व रसिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा व स्थळ
स्थळ: श्री महालक्ष्मी मंदिर समोर, काटगाळी, ता. खानापूर.
सकाळी ११ ते १: ओटी कार्यक्रम.
दुपारी १ ते ४: महाप्रसाद.
सायंकाळी ५ वाजता: सभेचे आयोजन.
रात्री ठीक ८:०० वाजता: संगित भजनी स्पर्धेला सुरुवात.
भव्य पारितोषिके व नाव नोंदणी तपशील
स्पर्धेसाठी प्रत्येक संघास २० मिनिटांचा वेळ दिला जाणार असून, प्रवेश फी ७०० रुपये ठेवण्यात आली आहे. विजेत्या भजनी मंडळांना आकर्षक रोख पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे:
प्रथम क्रमांक: ₹१०,००१/- (महालक्ष्मी भजनी मंडळ, काटगाळी यांच्याकडून)
द्वितीय क्रमांक: ₹८,०००/- (महालक्ष्मी भजनी मंडळ, काटगाळी यांच्याकडून)
तृतीय क्रमांक: ₹७,०००/- (महालक्ष्मी भजनी मंडळ, काटगाळी यांच्याकडून)
चतुर्थ क्रमांक: ₹६,०००/- (महालक्ष्मी भजनी मंडळ, काटगाळी यांच्याकडून)
पाचवा क्रमांक: ₹५,०००/- (श्री. अनिल पोवार, KEB वायरमन खानापूर यांच्याकडून)
सहावा क्रमांक: ₹४,०००/- (महालक्ष्मी भजनी मंडळ, काटगाळी यांच्याकडून)
सातवा क्रमांक: ₹३,५००/- (महालक्ष्मी भजनी मंडळ, काटगाळी यांच्याकडून)
आठवा क्रमांक: ₹३,०००/- (महालक्ष्मी भजनी मंडळ, काटगाळी यांच्याकडून)
नववा क्रमांक: ₹२,०००/- (महालक्ष्मी भजनी मंडळ, काटगाळी यांच्याकडून)
नाव नोंदणी : दि. ३०-११-२०२६ ते ०१-१२-२०२६ पर्यंत नावे नोंदवून घेण्यात येणार असून, त्यानंतर नावे स्वीकारली जाणार नाहीत. तसेच २९ ते ३०-११-२०२६ दरम्यान नोंदणी बाबतची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे पत्रकात नमूद आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी 9844343249, 9743911612, 6362845594, 9880684103 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
कार्यक्रमाचे उद्घाटन, दीपप्रज्वलन आणि विविध देवतांच्या प्रतिमा पूजनासाठी परिसरातील मान्यवर, शिक्षक, माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राडूप्पा मु. चौगुले (शिक्षक, हंगरगा) व श्री. शंकर म. पाटील (संगीतकार) करणार आहेत.
महत्त्वाचे नियम:
एका भजनी मंडळात किमान ७ ते कमाल ९ जणांचा समावेश असावा.
भजनी साहित्य (पेटी, तबला, टाळ इत्यादी) स्वतः आणावे; भजनामध्ये इलेक्ट्रिकवरचा वापर करता येणार नाही.
अभंग किंवा गवळण पूर्ण म्हणायची असून ती अर्धवट ठेवता येणार नाही तसेच एकट्यानेच पूर्ण करायची आहे.
भजन म्हणताना तबला किंवा पखवाज यापैकी एकच वाद्य वाजवावे; हार्मोनियम, तबला वादक आणि गायक एकाच स्पर्धेत एकाच संघाकडून भाग घेऊ शकतील.
एक गाव एक संघ’ राहील; स्पर्धेच्या वेळी आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
पाहुणे व भजनी मंडळांच्या जेवणाची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. पंच कमिटी, ग्रामस्थ व इतर सर्व मंडळे, काटगाळी हे या सोहळ्याचे व्यवस्थापक आहेत.
Advertise

Advertise

