खानापूर GPT शिक्षक संघाचा लोकशाहीला अनोखा आदर्श 


खानापूर GPT शिक्षक संघाचा लोकशाहीला अनोखा आदर्श 

बिनविरोध निवडणुकीतून जपली सामाजिक सलोख्याची परंपरा!

खानापूर: राजू कुंभार

सध्याच्या राजकीय व सामाजिक वातावरणात निवडणुका म्हणजे केवळ चढाओढ, मतभेद आणि कटुता असेच चित्र निर्माण झाले आहे. मात्र, याला छेद देत कर्नाटक राज्य (६-८) पदवीधर प्राथमिक शिक्षक संघ (रजि.), तालुका घटक खानापूर (GPT संघ) यांनी अत्यंत परिपक्वता दाखवत आपली निवडणूक पूर्णपणे बिनविरोध पार पाडली आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बिनविरोध निवडून आलेले संचालक:

श्री. बसवराज नागलापूर,श्री. एम. एन. पाटील, श्री. अँटोनी के. जे., श्री . गोविंद पाटील,श्री. लक्ष्मण देसाई,श्री. प्रकाश शेट्टेण्णवर,श्री. बसप्पा अप्पोजी,श्री. शहाजित मुल्ला,श्री. ईरण्णा काद्रोळी, श्री. गजानन पोतदार,श्रीमती नम्रता कुलकर्णी,श्रीमती.नेहा आदिवासी,

या प्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून अत्यंत शिस्तबद्धरीत्या कामकाज पार पाडल्याबद्दल श्रीमती एम. बी. संभाजी  व श्री. एन.एम्. करंबळकर  यांचे, तसेच बिनविरोध निवडून येण्यासाठी सहकार्य करून सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खानापूर तालुक्यातील सर्व जीपीटी (GPT) शिक्षक बांधवांचे नूतन संचालकांनी आभार व्यक्त केले

पारदर्शक प्रक्रिया आणि सामंजस्याचे दर्शन

या निवडणुकीत कोणतीही बळजबरी, गैरप्रकार किंवा उमेदवारी अर्ज नाकारण्याचे प्रकार न घडता, अत्यंत पारदर्शक पद्धतीने रितसर अर्ज मागवण्यात आले होते. सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी दाखवलेला समंजसपणा, परस्पर सहकार्य आणि परिपक्वता याच्या बळावर सर्वानुमते कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

लोकशाही मूल्यांची जोपासना

‘निवडणूक कशी असावी आणि लोकशाहीची मूल्ये कशी जपावीत’ याचा एक वस्तूपाठच खानापूर पदवीधर शिक्षक संघाने घालून दिला आहे. द्वेषाच्या वातावरणात ऐक्य आणि सहकार्याचा हा संदेश इतर सर्व संस्थांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

Advertise….


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!