चंदगडमध्ये भव्य रक्तदान शिबिर.


श्री चंद्रसेन गणेशोत्सव मंडळाचा २२ वर्षांचा सेवाभावी उपक्रम; रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.

चंदगड प्रतिनिधी: श्री.स्वप्निल कुंभार.

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री चंद्रसेन गणेशोत्सव मंडळ, चंदगड यांच्या वतीने शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाकडून गेल्या २२ वर्षांपासून अविरतपणे रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.

हे रक्तदान शिबिर मांडदेव चौक, चंदगड येथे आयोजित करण्यात आले असून, सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत रक्तदान करता येणार आहे. रक्तदान हे गरजू रुग्णांना जीवनदान देणारे महत्त्वपूर्ण कार्य असून, समाजातील प्रत्येक घटकाने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

“रक्तदान करा… जीवन वाचवा” या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात रक्तदात्यांनी आवर्जून उपस्थित राहून रक्तदान करावे आणि सामाजिक सेवेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक रक्तदानातून गरजू रुग्णाला मदतीचा हात मिळू शकतो. त्यामुळे स्वातंत्र्य दिनी देशसेवेसोबत मानवतेची सेवाही करण्याची संधी रक्तदात्यांनी साधावी, असे मंडळाने म्हटले आहे.


106
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!