खानापूर तालुक्याला प्रथमच चेअरमनपदाचा बहुमान; शिक्षक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव.
चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.
चंदगड तालुका शिक्षक पतसंस्था ही शिक्षकांची जुनी आणि जिव्हाळ्याची संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेचा ६७ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. यापूर्वी नेरसे गावचे शिक्षक संतोष देवळी यांनी संस्थेचे व्हाईस चेअरमनपद भूषविले होते. आता विनायक गिरी यांच्या निवडीमुळे नेरसे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. व्हाईस चेअरमनपदी संतोष सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.
सध्या गिरी हे शिनोळी खुर्द येथील शाळेत अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते जुनी पेन्शन संघटनेचे विद्यमान चंदगड तालुकाध्यक्ष आहेत.
सभासदांना यावर्षी सुमारे २२ टक्के लाभ देणारी ही संस्था आहे. यामध्ये १५ टक्के रोख लाभांश तसेच दोन वेळा भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. शिक्षकांना ९ टक्के व्याजदराने ४० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणारी ही संस्था शिक्षकांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
चंदगड तालुक्यात कार्यरत असलेले खानापूर तालुक्यातील अनेक शिक्षक या संस्थेचे सभासद आहेत. अशा संस्थेच्या चेअरमनपदी विनायक गिरी यांची निवड झाल्याने शिक्षक वर्गातून त्यांचे अभिनंदन होत असून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

