
शेतकऱ्यांसाठी मोठी सुविधा: डिसेंबरपासून फोनवरूनच होणार खताचे बुकिंग; ‘NFSF’ ॲप सुरू होणार
राजू कुंभार: नागुर्डा
शेतकऱ्यांना खत मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी डिसेंबरपासून नवीन मोबाईल ॲपद्वारे खताचे बुकिंग सुरू होणार आहे. या नव्या सुविधेमुळे शेतकऱ्यांना जवळच्या सोसायटी आणि दुकानांमधील खताचा थेट (लाईव्ह) साठा पाहून आगाऊ बुकिंग करता येणार आहे.
खत बुकिंगच्या या नव्या व्यवस्थेचे प्रमुख नियम खालीलप्रमाणे आहेत:
* ॲपद्वारे बुकिंग: डिसेंबरपासून शेतकरी ‘NFSF’ ॲपच्या माध्यमातून जवळच्या सोसायटी व दुकानांमधील खताचा लाईव्ह साठा तपासून आगाऊ बुकिंग करू शकतील.
* मर्यादा व कालावधी: महिन्यातून केवळ १ वेळा बुकिंग करता येईल. बुकिंग केल्यानंतर ३ दिवसांच्या आत खत खरेदी न केल्यास ते बुकिंग आपोआप रद्द होईल.
* स्मार्टफोन नसलेल्यांसाठी पर्याय: ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही, त्यांच्यासाठी ग्राम वन किंवा रैयत संपर्क केंद्रांमार्फत बुकिंगची मदत उपलब्ध करून दिली जाईल.
Advertise

Advertise

